मुलांच्या यशाचे गमक  XSEED Education System … उद्याचा नागरिक घडवणारे शिक्षण !

”शिक्षण” हाच यशस्वी जीवनाचा मूलमंत्र असल्याने मुलांना जीवनात यशासाठी तयार करणे ही पालक आणि शाळांची सर्वात मोठी जबाबदारी आहे.

खरतर अभ्यासाचे दडपण आणि प्रचलित अध्ययन पद्धतीमुळे मुलांना खऱ्या जीवनात  यश प्राप्त होत नाही. त्यासाठी पालकांनी योग्य शाळेची निवड करणे आवश्यक आहे. २१ व्या शतकातील कोविड नंतरच्या जगात, शाळेची निवड आणखी महत्त्वाची झाली आहे.

शालेय अभ्यासक्रम जरी एकच असला तरीही शाळा कशी आहे , शिक्षक कसे आहेत , शाळेचे शहर अथवा अथवा खेडे या व इतर अनेक घटकांमुळे शिक्षणाची Quality बदलते व त्यात एकवाक्यता, सुसूत्रता राहत नाही. म्हणूनच या सर्व घटकांचा विचार करून व जगातील अनेक शिक्षणपद्धतींचा अभ्यास करून आम्ही ग्रामीण भागातील मुलांचा संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी; ज्ञानरचनावादा वर आधारित “XSEED 5 STEP Learning Method” या आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारलेल्या उत्कृष्ट शिक्षण पद्धतीचा अवलंब करणारी Divine Orchids  ही इंग्रजी माध्यमाची शाळा २०१६ साली जव्हार येथे  सुरू केली आहे.

या  आंतरराष्ट्रीय शाळेत Learning by doing, Learning by playing, Learning by drawing, Learning by Singing या उपक्रमांचा अवलंब करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते त्यामुळे अभ्यासाचा ताण न घेता विद्यार्थी शिकतात व प्रत्येक मुलाकडे व्यक्तिगत लक्ष दिले जाते.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे, त्याच्या क्षमता, त्याची बुद्धिमत्ता, कौशल्य,  क्षमता, शारीरिक कृती, कलागुण यांचे स्टॉक एक्सचेंज बाजारातील  शेअरचे मूल्यांकन जसे आपण करतो तसे  शिक्षणाचे मूल्यांकन केले जाते.

आधिक महितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर टॅप करा..! 👇🏻

https://admission.carrd.co/

Xseed Education System काय आहे?

XSEED ही एक अंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जाणारी यशस्वी शिक्षण प्रणाली आहे. जी मुलांमध्ये विचार करण्याचं कौशल्य आणि खऱ्या जीवनातील समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसीत करते. ज्यामुळे विद्यार्थी २१ व्या शतकातील संधी प्राप्त करण्यासाठी सुसज्ज बनतात आणि त्यांना अधिक आत्मविश्वास प्राप्त होऊन ते आत्मनिर्भर बनण्यासाठी मदत होते.

 XSEED शिक्षण प्रणाली द्वारा जगातील अग्रगण्य असलेल्या 3000 शाळांमध्ये २ दशलक्ष मुलांना शिक्षण आणि 100,000 शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते.

आधिक महितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर टॅप करा..! 👇🏻

https://admission.carrd.co/

विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त करणे तेव्हाच सुलभ होते; जेव्हा आपल्या परिचयाच्या भाषेतून ज्ञान मिळते. त्यामुळेच संपर्काची भाषा व ज्ञान भाषा असणे यात जमिन-अस्मानाचा फरक आहे. म्हणूनच मुलांना शाळेत घालताना नेहमी प्रश्न उभा राहतो की  मुलांना कोणत्या शाळेत घालायचे? इंग्रजी माध्यमाच्या की मातृभाषेच्या माध्यमाच्या?

मातृभाषा म्हणजे त्याचे आईवडील, घरातील माणसे घरात जी भाषा बोलतात ती भाषा. मातृभाषेतून शिक्षण चेणे केव्हाही चांगले; संपूर्ण जगाचा आपण आढावा घेतला तर असे आढळते की, बहुतांशी देशातील मुले आपापल्या मातृभाषेतूनच शिकत असतात कारण त्या त्या देशांची एकच मातृभाषा असते आणि तीच राष्ट्र भाषा असते.

परंतु विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील प्रत्येक राज्याची वेगळी वेगळी भाषा आहे. असे मानतात की भारत देशात मात्र दर १२ मैलाला भाषा बदलते. त्यामुळेच आपल्या संपूर्ण देशासाठी एका विशिष्ट भारतीय भाषेत सामायिक अभ्यासक्रम लागू करू शकत नाही. म्हणूनच इंग्रजी या ज्ञान भाषेचा पर्याय आपल्या देशात स्वीकारला गेला आहे. खास करून उच्च शिक्षण घेण्यासाठी आपल्याला English भाषे शिवाय पर्यायच नाही.

हे वास्तव मान्य करून विद्यार्थ्याचा उत्कर्ष कसा होईल याचा विचार करून 5 Step XSEED शिक्षण प्रणाली द्वारे आंतर्राष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी इंग्रजी माध्यमाची शाळा आम्ही जव्हार येथे सुरू केली आहे. या उत्कृष्ट शिक्षण प्रणालीचा लाभ सर्व स्तरातील पालकांच्या मुलां पर्यंत पोहोचेल असा आमचा विश्वास आहे.

जे पालक आपल्या मुलांसाठी दर्जेदार English Medium शाळेच्या शोधात आहेत अश्या पालकांनी या स्वच्छ सुंदर शाळेला आवश्य भेट द्यावी आणि आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आजच या शाळेत प्रवेश  आजच निश्चित करावा.

या शाळेमध्ये आपल्या मुलांची शिकण्याची क्षमता, विचारक्षमता, विश्लेषणक्षमता, जिज्ञासा, सर्जनशीलता   संवाद कला, सहयोगी भावना, नेतृत्व गुण,  सर्जनशीलता, तंत्र ज्ञांनाची आवड व रोजगारक्षमता वाढून एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांची जडण घडण होईल.

आधिक महितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर टॅप करा..!👇🏻

https://admission.carrd.co/

मुलांना कोणत्या शाळेत घालायचे? मातृभाषेच्या की इंग्रजी माध्यमाच्या?

मात्र जगाला गुरू-शिष्य परंपरेची देणगी देणाऱ्या आपल्या देशात जागतिकीकरणाच्या रगाडय़ात गुरू-शिष्य परंपरा लोप पाऊन केवळ पाठांतरावर आधाररीत शिक्षण पद्धतीचा उगम झाला आहे. इंग्रजी शिक्षणाचा पगडा असलेल्या मानसिकतेमुळे इंग्रजी शाळांत पाल्यांना धाडण्यात येते. यामुळे धड इंग्रजी पक्के होत नाही आणि मराठीच्या नावाने देखील बोंब! त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांना नेहमी प्रश्न पडतो की, आपल्या मुलांना कोणत्या शाळेत घालायचे? मातृभाषेच्या की इंग्रजी माध्यमाच्या?

खरंतर आपण सर्वानाच अपापल्या मातृभाषेविषयी नितांत आदर आहे. आपल्या मातृभाषेला देखील ज्ञान भाषा करणे आवश्यक आहेच. परंतु जगात यशस्वी व्हायचे असेल तर उत्तम इंग्रजी बोलता आले पाहिजे म्हणजेच अभिव्यक्त होणे महत्त्वाचे आहे, याची जाणीव आता प्रत्येक घराघरात रुजली आहे. या जाणीवेतूनच पालकांकडून  मुलांना इंग्रजी शाळांत धाडण्यात येते. इंग्रजी ही जगाची ज्ञानभाषा असल्याने पालक आपल्या मुला-मुलींच्या भवितव्याचा विचार करून English Medium शाळेची निवड करतात. त्यात काहीही गैर नाही.

आपल्या सर्वांना इंग्रजी भाषेचे आकर्षण आहे. परंतु आपल्या देशातील ग्रामीण भागातील बहुतांशी English Medium शाळांमधील शिक्षकच जर इंग्रजी भाषा शिकवण्यास अथवा विषय शिकवण्यास समर्थ नसतील तर ते त्यांच्या विद्यार्थ्यांना English मधून कसे शिकवतील? हा खरा प्रश्न आहे; आणि आपल्या भागातील विद्यार्थी आजही इंग्रजी संभाषण करू का करू शकत नाही? या प्रश्नाचे उत्तर वरील प्रश्नात दडले आहे.

सध्याच्या स्पर्धेच्या युगाचे इंग्रजी हे एक माध्यम बनले आहे; हे ओळखून मुलांना इंग्रजी शाळेत पाठविले जाते खरे; कित्येक मुलांना आपण पाहतो जे इंग्रजी माध्यममध्ये शिकून सुद्धा त्यांची इंग्रजी बोलण्यातील शुद्धता फार चांगली नाही तसेच ते आपली मातृभाषा सुद्धा नीट बोलू शकत नाहीत.

खरतर  शिक्षण हे ज्ञान आणि आपल्या नैतिक मूल्यांची देवाण घेवाण आहे, भाषा हे केवळ मध्यम आहे. त्यामुळे आपल्या जबरदस्तीने आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमा मधेच  टाकण्याचा हट्ट करत बसू नये आणि टाकायचेच असल्यास इंग्रजी शाळांचा दर्जा तपासून मगच पालकांनी योग्य निर्णय घ्यावा. याचे कारण मुलांना इंग्रजी भाषेतून ज्ञान प्राप्ती तेव्हाच होईल जेव्हा त्यांचे त्या भाषेवर प्रभुत्व असेल; आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व तेव्हाच येईल जेव्हा पालक त्यांच्यासाठी इंग्रजी मध्यमची योग्य शाळा निवडतील. अन्यथा जरी इंग्रजी ही जागतीक ज्ञान भाषा असली तरी त्या भाषेवर प्रभुत्व नसल्यास ती केवळ संपर्काची भाषा ठरेल!

आधिक महितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर टॅप करा..! 👇🏻

https://admission.carrd.co/

शाळेत प्रवेश घेताना योग्य शाळेची निवड पालकांनी कशी करावी?

मात्र जगाला गुरू-शिष्य परंपरेची देणगी देणाऱ्या आपल्या देशात जागतिकीकरणाच्या रगाडय़ात गुरू-शिष्य परंपरा लोप पाऊन केवळ पाठांतरावर आधाररीत शिक्षण पद्धतीचा उगम झाला आहे. इंग्रजी शिक्षणाचा पगडा असलेल्या मानसिकतेमुळे इंग्रजी शाळांत पाल्यांना धाडण्यात येते. यामुळे होते काय, धड इंग्रजी पक्के होत नाही आणि मराठीच्या नावाने बोंब! 

यासाठी आपल्या मुलांचा शाळाप्रवेश ही पालकांसाठी महत्त्वाची बाब असते. मात्र कोणत्या शाळेत घालावे, कोणत्या माध्यमात किंवा कोणत्या बोर्डात घालावे, असे अनेक प्रश्न शाळाप्रवेशाच्या वेळी पालकांसमोर असतात. पालकांसाठी ही मोठी मोठी कसोटी असते. त्यामुळे शाळेत प्रवेश घेण्याआधी घरातील पालकांनी आपापसात विचारविनिमय करून उपलब्ध शाळांचा अभ्यास, विश्लेषण करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील मुद्दे विचारात घेणे गरजेचे आहे.

▪️ १. अभ्यासक्रम आणि आध्यापन पद्धती: शाळेत राबविला जाणारा अभ्यासक्रम, व अध्यापन पद्धत कोणती आहे हे पालकांनी जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्या देशात विविध मंडळांचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पालकांनी आपल्या पाल्याच्या गरजेप्रमाणे विचार करून, शैक्षणिक अभ्याक्रम निवडावा.

▪️ २. भौतिक साधन सुविधा व स्वछता: शाळेमध्ये प्राथमिक साधन सुविधा म्हणजे सुरक्षित आणि स्वछ इमारत विद्यार्थ्यांना Activities साठी लागणारे शैक्षणिक साहित्य, वर्गात पुरेसा उजेड, खेळती हवा व स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे.

▪️ ३. आर्थिक भार: अनेकदा एखाद्या शाळेत प्रवेश घेणे सोपे असते. मात्र प्रवेश घेताना शाळेचे शुल्क व इतर शैक्षणिक खर्च याचे भान पालकांनी ठेवणे आवश्यक असते.

▪️ ४. शिक्षकांची गुणवत्ता व मानसिकता: शाळा कोणतीही असली तरी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचे सर्वात महत्त्वाचा दुवा शिक्षकच आहेत. शाळेतील शिक्षकाची गुणवत्ता ही यशस्वी शाळेची खूणगाठ आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. आधुनिक शिक्षण शास्त्रात शिक्षक हा केवळ शिक्षक न राहता विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक, Philosopher आणि Guide असतो.

शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच त्यांची मानसिकता हा पण महत्त्वाचा घटक आहे. शाळेतील शिक्षकांची प्रयोगशिलता, शिकण्याचा आणि शिकवण्यातील उत्साह हे सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहे.

▪️ ५. पालक, शिक्षक आणि व्यवस्थापन संबंध आणि विश्वास : शिक्षक, पालक व्यवस्थापन यांच्यात स्नेहसंबंध व विश्वासाचे नाते असणे आवश्यक आहे. व्यवस्थापनाचे धोरण व वागणूक कितपत संवेदनशील आहे, ही बाब शाळेतील आनंददायी वातावरणाला मदत करत असते.

▪️ ६. कौशल्य आधारित व्यक्तिमत्व विकास : अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणकौशल्याची वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातात. काही शाळा विशिष्ट गुणकौशल्य जोपासतात. काही शाळा शैक्षणिक, सांस्कृतिक, कला या क्षेत्रांना वेगवेगळे प्राधान्य देतात. आपल्या पाल्याची आवड आणि Life Skills बद्दल पालकांनी सजग असणे आवश्यक आहे.

सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. FACEBOOK, WHATSAPP यूट्यूब या सारख्या INTERNET SOCIAL MEDIA माध्यमांतून माहितीचा विस्फोट झाला आहे. परंतु ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी विद्यार्थ्याला GOOGLE वर केवळ माहिती मिळवून भागणार नाही; तर माहितीचा उपयोग करण्यासाठी लागणारी कौशल्ये त्याला अनुभवातून आत्मसात करता येणे ही या संगणकीय युगाची खरी गरज आहे.

पालकांनी वरील सर्व बाबींचा एकत्रित विचार करूनच आपल्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य त्या शाळेची निवड करावी यावी.

जव्हार येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेबद्दल अधिक महिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर टॅप करा..!👇🏻

https://admission.carrd.co/

निराशेतून जन्माला आलेली मार्काच्या पलीकडची, लहान मुलांची आशादायक शाळा !

आपल्या देशात स्वातंत्र्याच्या वर्षानंतर सुद्धा आपल्या ग्रामीण भागात आजही दर्जेदार शिक्षण मिळणे एक दुर्लभ गोष्ट आहे. माझा मुळचा व्यवसाय संगणक प्रशिक्षणाचा. संगणकाची मुळ भाषा इंग्रजी असल्याने गेली दोन दशके या व्यवसायात काम केल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती, ती म्हणजे संगणकाचे प्रशिक्षण घेताना आपल्या ग्रामीण भागातील मुलांची इंग्रजी भाषेची अडचण. हे आव्हान कायमच असायचे. M.Sc असणाऱ्या विद्यार्थ्याने give चे spelling GIV आणि take चे spelling TEK असे लिहीणे अपेक्षित आहे का? हिरव्या रंगाला Blue आणि निळ्या रंगाला Green संबोधणारी, b आणि d या अक्षरात गोंधळणारी मोठी मुलं अशी अनेक उदाहरणे मी जवळून पाहिली आहेत. याचे कारण मागील १२ वर्षाच्या काळात ग्रामीण भागात अनेक इंगजी माध्यमाच्या शाळा सुरु झाल्या, पण त्याचा दर्जा कसा आहे हे वरील उदाहरणावरून सहज दिसून येते आणि मन निराश होते. कारण आजही ग्रामीण भागात शाळांचा दर्जा हवा तसा नाही, हेच या वरून अधोरेखित होते. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांचा काहीही दोष नसताना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेली ग्रामीण भागातील ही नवी पिढी केवळ बेरोजगारीत भर टाकत आहे आणि त्यातून ती अधिक निराश होत आहे.

याउलट ३० वर्षांपूर्वीचा आमच्या वेळच्या मराठी शाळेचा दर्जा हा खरच चांगला होता. त्यावेळचे शिक्षक खूप वाहून घेतलेले असत. आज चांगले शिक्षक दुरापास्त झाले आहेत आणि जे चांगले आहेत त्यांना प्रवाहा बरोबर चालणे भाग पडते म्हणून ते देखील निराश आहेत. कारण केवळ एकाच विषयाचे किंवा एकाच वर्गाचे एखादे शिक्षक चांगले असून भागत नाही. दर्जेदार शिक्षण देणे ही त्या त्या शाळेतील सर्वच शिक्षकाची ती सामुहिक जबाबदारी असते. कितीतरी चांगले शिक्षक मला येऊन भेटतात आणि आणि त्यांची ही खंत माझ्यापाशी व्यक्त करतात. त्यामुळे ते देखील निराश आहेत. खरतर आपल्या देशात जसा डॉक्टरांना ईश्वराचा दर्जा आहे तसाच शिक्षकांना गुरु-देवाचा दर्जा आहे. या दर्जाचे शिक्षक आजही आहेत. परंतु शिक्षक भरती करण्याच्या पद्धतीत तुम्ही केवळ पगारासाठी शिक्षक होताहेत की एक चांगली पिढी घडवण्याचे तुमचं स्वप्न आहे, म्हणून तुम्हाला शिक्षक व्हायचे आहे हे तपासण्याचा शासनाकडे कोणताही मार्ग नाही; शिवाय पैसे खर्च करून किंवा वशिल्याने जे शिक्षकाची नोकरी प्राप्त करतात, त्याच्यासाठी ती केवळ एक नोकरीच असते, Educational Mission नसते. साहजिकच ज्यांच्या घरी इंग्रजी शाळेला आवश्यक अभ्यासाचे वातावरण आहे आणि ज्यांचे पालक मुलांच्या अभ्यासात लक्ष घालतात; आणि ज्या मुलांची पाठांतर क्षमता जन्मताच चांगली आहे अशाच इंग्रजी माध्यमाच्या मुलांना शालेय शिक्षणानंतर उच्चशिक्षण प्राप्त करण्यात यश येते.

ज्यांची पहिलीच पिढी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहे अशा मुलांच्या पालकांची आव्हाने तर अजून वेगळीच आहेत. त्यावर एक स्वतंत्र लेख लिहिता येईल. स्वातंत्र्याची सात दशके उलटल्यानंतर सुद्धा हीच परिस्थिती आपल्या वाट्याला येत असेल तर आपलेच काहीतरी चुकते आहे असे मला वाटू लागले. आपल्या भागातील संगणक प्रशिक्षण घेतलेली मुलं गावात बेरोजगार फिरत असल्याचे बघून मला समाधान वाटत नव्हते. त्यांच्या रोजगाराचे काहीतरी बघायला हवे असे वाटून मी शहरातील काही नोकरी देणाऱ्या संस्थांशी (Placement Agency) संपर्क केला असता त्यांनी, तुमच्या भागातील मुले कशी आहेत ते जाणून घ्यावे लागेल असे उत्तर दिल्यावर मी त्या Placement Agency च्या प्रतिनिधीना आपल्या ग्रामीण भागातील मुलांना भेटण्यासाठी आमंत्रित केले. त्यासाठी बेरोजगार मुलांचे मेळावे घेतले. मुलांशी संवाद साधल्यावर आणि आपल्या ग्रामीण भागाचा Market Survey केल्यावर त्यांनी असे सांगितले की, ग्रामीण भागात कोणतेही मोठे उद्योग-धंदे नाहीत आणि त्यांना शहरात नोकरी दिली तरी त्यांच्याकडे कोणतेही Skill नसल्याने त्यांना जास्त पगाराचा Job देऊ शकत नाही. परंतु त्यांना शिकाऊ उमेदवार म्हणून कमी पगाराची नोकरी शहरात सहज मिळू शकेल आणि त्यानंतर अनुभवाने त्यांचे Skill विकसित झाल्यावर त्यांना मोठ्या पगाराची नोकरी ते स्वत:च्या हिमतीवर मिळवू शकतात. Placement Agency च्या तज्ञांनी देलेल्या सल्ल्यानंतर मी येथील स्थानिक उमेदवारांना विनामूल्य प्रशिक्षण (Skill based) व त्यानंतर नोकरीची हमी, असे आवाहन करणारी ५००० रंगीत पत्रके छापली आणि आपल्या ग्रामीण भागात ती घरोघरी वाटली. एस.टी. बस stand वर प्रतिमाह ४५००/- रुपये दराने तीन महिने होर्डिंग भाड्याने घेऊन मोफत प्रशिक्षण व नोकरीची संधी देण्याची जाहिरात केली; आणि इच्छुक उमेदवाराची प्रतिक्षा सुरु झाली. असे वाटले की युवकांची रांग लागेल. ग्रामीण भागात खूप बेरोजगारी असल्याने या जाहिरातीला खूप प्रतिसाद मिळेल असा विश्वास होता. पण तीन महिने प्रतीक्षा केल्यावर धक्कादायक आणि निराशाजनक RESULT समोर आला. केवळ तीन युवकांनी नोकरी पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज भरला.

एरवी सरकारी नोकरीच्या चार पाच जागांसाठी जाहिरात निघाली की आमच्या Computer Centre मध्ये Online Form भरण्यासाठी भलीमोठी रांग लागायची आणि आता तर मोफत असून केवळ ३ उमेदवारांचे अर्ज आले. किती हे निराशाजनक होते!* माझा हा प्रयत्न फसला, तरी देखील जाहिरातीचे पैसे व्यर्थ गेले नाही असे मी समजतो. कारण या प्रयोगातून ग्रामीण भागातील मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास झाला. त्यातून खालील निष्कर्ष निघाले.

१) महाविद्यालयीन शिक्षणा नंतर Skill based Courses च्या प्रशिक्षणाचे महत्व नाही.

२) ग्रामीण भागातील मुलांचा सरकारी नोकरी मिळण्याकडेच कल जास्त

३) सद्य काळात सगळी कडे नोकरी देण्यासाठी पैसे घेत असताना कोणी मोफत नोकरी देईल अशी मानसिकता नाही.

४) उद्योग जगतात काय चालू आहे आणि कशाची मागणी आहे, त्यानुसार आपण काय नवीन शिकले पाहिजे याची माहिती नाही.या नंतर मी जव्हारचे तत्कालीन नगरसेवक माझे मित्र कै. अमोल औसरकर आणि श्री. लालू चव्हाण तसेच माझे बंधू श्री. विनीत मुकणे यांना सोबत घेऊन *महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उद्योग मंत्री मा. श्री. नारायण राणे यांच्या मार्गदर्शना खाली आणि मा. श्री. नितेश राणे यांच्या नेतृवाखालील स्वाभिमानी संघटनेमार्फत आयोजित केलेल्या बेरोजगार मेळाव्यासाठी गावा गावातून सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या मदतीने सुमारे २०० बेरोजगार युवकांना गोळा करून जव्हार येथून तीन Special एस.टी. बसेस करून मुंबईच्या कामगार मैदानावर आयोजित केलेल्या भव्य बेरोजगार मेळाव्यासाठी घेऊन गेलो. एकाच दिवशी २३००० युवकांना नोकरी देण्याचा विश्वविक्रम या मेळाव्याने प्रस्तापित केला. आपल्या ग्रामीण भागातील युवकांकडे विशेष Skill Set नसल्याने कंपन्यांनी Offer केलेल्या अल्प पगारामुळे, शहरात राहण्याची सोय नसल्याने अनेकांनी ते, Job स्वीकारले नाहीत.

या दुसऱ्या प्रयत्नात पुन्हा मला ग्रामीण भागातील युवकांच्या खालील अडचणी लक्षांत आल्या.

१) खाजगी उद्योगांना लागणारे Skill Sets ग्रामीण युवकांकडे नसल्याने त्यांना जास्त पगाराची नोकरी शहरात मिळू शकत नाही.

२) मिळणाऱ्या त्या अल्प पगारात शहरात राहण्याची व जेवणा-खाण्याची सोय परवडत नाही.

३) महाराष्ट्रात परप्रांतीय जसे एक खोली भाड्याने घेऊन एकत्र राहून Adjustment करतात, आळीपाळीने जेवण बनवून हॉटेलच्या जेवणाचा खर्च वाचवतात. तसे करणारे युवक ग्रामीण भागात कमी आहेत.

या दुसऱ्या प्रयत्नाला देखील फारसे समाधानकारक यश आले नाही म्हणून मी निराशेतून बाहेर येऊन पुन्हा दुसऱ्या Placement Agency ला संपर्क केला आणि त्यांना या भागातील युवकांच्या वरील अडचणी सांगितल्या. यावेळी त्यांनी दुसरा असा पर्याय सुचविला की, या युवकांना आपण प्रशिक्षण देवून तारांकित हॉटेल मध्ये नोकरी देऊ; कारण तिथे त्यांची राहण्याची सोय होईल. तसेच त्याच्या जेवणाची देखील सोय होईल. शिवाय त्यांना दिवसाला किमान ५००/- ते १०००/- रुपये भरपूर टिप्स मिळतील. त्यात त्यांचा स्वत:चा खर्च भागेल आणि संपूर्ण पगार ते आपल्या घरी आई-वडिलांना पाठवू शकतील.

मला ही कल्पना खूपच आशादायक वाटली आणि त्यानुसार मी जव्हार येथे Hotel Management College सुरु करण्याची तयारी सुरु केली.विविध संस्थांचा अभ्यास केल्या नंतर १००% नोकरीची हमी देणाऱ्या Asansol college of Hotel Management या कलकत्ता येथील संस्थेकडे त्यांची शाखा जव्हार थेथे सुरु करण्यासाठी त्यांची Affiliation फी भरली आणि मान्यतेसाठी अर्ज केला. माझ्या अर्जाची तपासणी केल्यानंतर त्यांचे प्रतिनिधी Feasibility Check करण्यासाठी कलकत्ता येथून मुंबई विमानतळावर आले. तेथून मी त्यांना माझ्या गाडीने जव्हारला घेऊन येण्यास निघालो.

प्रवासात मी त्यांना येथील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीची पूर्व कल्पना देत होतो. साधक बाधक चर्चा करत-करत आम्ही भिवंडी पर्यंत पोहचलो आणि अचानक मला घरून फोन आला की माझ्या वडिलांना (ॲड. राजाराम मुकणे) मोखाडा येथे हार्ट अटॅक आला आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने मुंबईला न्यावयाचे आहे. मी माझ्या भावाला सांगितले की तुम्ही त्यांना प्राथमिक उपचारासाठी जव्हार कॉटेज हॉस्पिटलमध्ये घेऊन या, तोपर्यंत मी जव्हारला पोहचतोच. क्षणभरापुर्वीच माझ्या मनात बेरोजगार युवकांच्या चिंतेचा विषय होता, आता त्या विचारांची दिशा बदलली आणि वडिलांच्या तब्बेतीची चिंता वाटू लागली. माझ्यासोबत असलेल्या Asansol College of Hotel Management च्या प्रतिनिधीना मी अचानक उद्भवलेली ही आणीबाणीची परिस्थिती सांगितली. ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका, आम्ही जव्हारला एखाद्या हॉटेल मध्ये थांबुन आमचे Inspection चे काम करतो. तुम्ही तुमच्या वडिलांना उपचारासाठी मुंबईला घेऊन जा.

मी गाडीचा वेग वाढवला आणि अखेर दोन तासात आम्ही जव्हारला पोहचलो गाडी थेट जव्हारच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये नेली. तोपर्यंत माझ्या वडिलांवर प्राथमिक उपचार झाले होते; आणि आता त्यांच्या तब्बेतीत थोडी सुधारणा झाल्याने मला देखील थोडे बरे वाटले. त्यांच्या तब्बेतीची विचारपूस झाल्यानंतर माझ्या सोबत असलेल्या कलकत्ता येथू आलेल्या Hotel Management च्या प्रतिनिधीशी वडिलांची ओळख करून दिली. वडिलांनी तत्काळ मला सांगितले की, मी निशांतला (माझे लहान बंधू) घेऊन मुंबईला उपचारासाठी जातो, तू येऊ नकोस ! तू Hotel Management च्या प्रतिनिधींसोबत जव्हारला थांब आणि तुम्ही तुमचे काम करून घ्या.

वडिलांच्या सूचनेनुसार मी जव्हारलाच थांबण्याचा निर्णय घेतला आणि माझे लहान बंधू ॲड. निशांत मुकणे हे माझ्या वडिलांना घेऊन मुंबईला तातडीने रवाना झाले. ते गेल्यावर येथील शांती सरोवर या रिसोर्टचे मालक माझे मित्र श्री. संतोष भट्टड यांच्याशी संपर्क साधून आणि Hotel Management च्या प्रतिनिधीची एक दिवसाच्या मुक्कामाची सोय केली. श्री. संतोष भट्टड यांनी त्यांचे येण्याचे सामाजिक कारण जाणून घेतल्यानंतर हॉटेलमध्ये राहण्याचे व जेवण-खाण्याचे कोणतेही पैसे घेतले नाहीत.

काही काळ हॉटेल मध्ये आराम केल्यानंतर Asansol College of Hotel Management च्या प्रतिनिधीना घेऊन मी Hotel Management College च्या प्रस्तावित इमारतीची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर घेऊन आलो. त्यांनी इमारतीची तपासणी केली आणि प्रस्तावित जागेबाबत समाधानी होऊन त्यांनी तोंडी मान्यता दर्शवली. परंतु त्यांनी इथल्या स्थानिक युवकाबरोबर आम्हाला संवाद साधून त्यांचे Communication Skill कसे आहे ते पहावयाचे आहे, अशी सूचना मला दिली.

त्यानुसार दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागातील युवकांना आमच्या जव्हार येथील संगणक प्रशिक्षण केंद्रात Hotel Management च्या प्रतीनिधींशी संवादपर सत्र आयोजित केले. या सत्रात Hotel Management च्या प्रतीनिधींनी स्थानिक युवकांशी संवाद साधून व त्यांच्या वैयक्तिक मुलाखती घेऊन त्यांचे अवलोकन केले. त्यानंतर त्यांचा अहवाल माझ्यासमोर मांडला. त्यातील प्रमुख मुद्दे खालील प्रमाणे होते.

१) मुलांचे इंग्लिश भाषेवर प्रभुत्व नाही. त्यांना इंग्लिश बोलायला शिकवावे लागेल. कारण आम्ही ज्या स्टार हॉटेल मध्ये त्यांना नोकरीची १००% हमी देतो त्या हॉटेल मध्ये वेटरला देखील ग्राहकांसोबत इंग्रजी बोलावे लागते. शिवाय मुलांचे हिंदी उच्चारही चांगले नाहीत.

२) मुलांमध्ये आत्मविश्वास कमी आहे, त्यामुळे त्यांची Personality Develop करून त्यांचे Grooming करावे लागेल.

३) मुलांची नोकरीसाठी परराज्यात जाण्याची तयारी नाही. त्यांचे Brain storming करून त्यांचा Mindset बदलावा लागेल.

४) वरील सर्व गोष्टी करण्यासाठी त्यांच्यावर एक वर्ष जादा मेहनत घ्यावी लागेल. त्यासाठी त्यांना जादा फी भरावी लागेल.त्यावर मी त्यांना सांगितले की, मुलं ग्रामीण भागातील आहेत; शिवाय गरीब आहेत. जादा फी भरायला त्यांना जड जाईल. त्यावर Hotel Management च्या प्रतीनिधींनी मला सांगितले की, तुम्ही इथे जव्हारला कॉलेज चालू करण्याऐवजी मोठया शहरात का चालू करत नाहीत? आम्ही तुम्हाला लगेच मान्यता देतो. इथे तुम्हाला तुम्हाला फायदा होईल असे आम्हाला वाटत नाही. त्यावर मी त्यांना म्हणालो की माझ्या ग्रामीण भागातील मुलांना फायदा होणार नसेल तर मी शहरात Hotel Management college सुरु करून काय करू ? त्यावर ते म्हणाले की ही खर्चिक बाब आहे. तुम्ही निर्णय घ्या.

दरम्यान मुंबईच्या नावाजलेल्या सिडनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाचे विख्यात प्राध्यापक श्री. बी. एन. लाड यांनी माझ्याशी संपर्क केला आणि मुंबईत Management College मध्ये आदिवासी मुलांच्या राखीव जागा रिक्त आहेत. मी त्यांना प्रवेश देण्याची व्यवस्था करतो. शिवाय आपण त्यांना आमच्या विश्वस्त संस्थेच्या ठाणे शहरातील येऊर येथील इमारतीत राहण्याची व्यवस्था करू, असे आश्वासन दिले आणि जव्हार कोलेजच्या प्राचार्यांची माझी भेट घालून द्या, म्हणजे मला महाविद्यालयातील विद्यार्थांशी संवाद साधता येईल असे सुचविले. त्यांच्या सुचनेनुसार मी जव्हार कॉलेजचे प्राध्यापक श्री. हेमंत मुकणे यांच्याशी संपर्क करून जव्हार कोलेजच्या प्राचार्यांची भेटीची तारीख ठरवली. ठरलेल्या तारखेला मी सिडनहॅम महाविद्यालयाचे प्राध्यापक यांची जव्हार कोलेजच्या प्राचार्य व प्रध्यापकांसोबत त्यांची भेट घालून दिली. त्याच्याशी चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांकरिता महाविद्यालयात आयोजित केलेल्या सेमिनारमध्ये प्राध्यापक श्री. बी. एन. लाड व माझे मार्गदर्शनपर सत्र संपवून श्री. बी. एन. लाड यांनी विद्यार्थांशी संवाद साधून त्यांची शैक्षणिक व बौद्धिक पात्रता व मर्यादा जाणून घेतली.

मी देखील श्री. बी. एन. लाड सर यांना माझे यापूर्वीचे प्रयत्न, ग्रामीण भागातील विद्यार्थांच्या मर्यादा आणि येथील प्राध्यापकांपुढील असलेली आव्हाने याबाबत चर्चा केली. अनेक अडचणींचा पाढा वाचूनसुध्दा ते खूप Positive होते. त्यांनीही हाच सल्ला दिला कि या मुलांचे Graduation पूर्ण होई पर्यंत त्यांना इथेच इग्रजीचे प्रशिक्षण देऊन त्यांची Personality Develop करून त्यांना ‘पॉलिश’ करावे लागेल. या नंतरच आपण त्यांना MBA ला प्रवेश देऊ शकतो. याबाबत जव्हार महाविद्यालयाने नंतर काय पावले उचलली याबाबत मला माहिती नाही. परंतु काही वर्षापूर्वीच जव्हार महाविद्यालयात सायन्स (B.Sc.) ची शाखा सुरु झाली आहे. तेथे सायन्सच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या एका प्राध्यापकांनी मला त्यांचा अनुभव Share केला. त्यांनी मला असे सांगितले की, येथील स्थानिक इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून १२ वी सायन्स होऊन जेव्हा मुले आमच्या महाविद्यालयात B.Sc करिता प्रवेश घेतात, तेव्हा त्यांना शिकवताना आम्हाला सायन्सचे विषय सोडून पहिला महिनाभर केवळ इंग्लिश शिकवावे लागते. कारण सुरुवातीच्या काळात आम्ही त्यांना काय शिकवतो ते त्यांना समजत नाही; इतके त्यांचे इंग्रजी कच्चे असते. गेल्या अनेक वर्षाच्या माझ्या प्रयत्नातून आणि त्यातून मला आलेल्या अनुभवातून मी शेवटी एकच सारासार निष्कर्ष काढला….. या सर्व समस्यांचं मूळ शाळेत आहे. दर्जाहीन इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे एका पिढीचं नुकसान झालं आहे.

आपल्या मातीत जन्माला येणाऱ्या ग्रामीण भागातील भावी पिढीचं हे नुकसान थांबवायचं असेल तर आणि त्याचं भवितव्य घडवायचं असेल, तर आपण स्वत:च दर्जेदार शाळा चालू करायला पुढाकार घेतला पाहिजे; आणि अगदी लहानपणा पासूनच बालकांना दर्जेदार शिक्षण ग्रामीण भागात उपलब्ध केले पाहिजे. कारण ओल्या मातीला आकार देता येतो; पण बनवलेल्या मडक्याला पुन्हा आकार देणे शक्य नाही.शाळा सुरु करण्याचा वेडा विचार मनात आला खरा पण इतके पैसे कुठून आणायचे? असा प्रश्न पडला.. म्हणून मग विचार केला की आपण हळू हळू सुरुवात करू. माझं पाहिलं पाऊल म्हणुन जगातील यशस्वी शिक्षण पद्धतीचा अभ्यास मी सुरु केला. अनेक शहरातील काही संस्था चालकांना भेटलो. एक कॉमन सल्ला मला सतत मिळत होता पैसा असेल तर हात टाका! हाती खूप पैसे नव्हते तरीही माझे मन मागे हटत नव्हते. जव्हारचे माजी नगराध्यक्ष माझे वडील ॲड. राजाराम मुकणे यांना मी माझा विचार सांगितला, त्यांनी त्यांच्या मालकीची जागा शाळेला देण्याचे कबुल केले. परंतु मी घाई न करता हळू हळू पुढे जाण्याचा विचार केला आणि प्रथम आमच्याच खाजगी इमारतीत दोन मजल्यांवर पूर्व प्राथमिक शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला व एक-एक वर्ग दरवर्षी वाढवत नेण्याचे पक्के केले.

देशातील व जगभरातील विविध शिक्षण पद्धतीच्या अभ्यासांती न्यूयॉर्क येथील American Montessori Society आणि देशातील बँगलोर येथील Kreedo Early Childhood Solution तसेच सिंगापूर येथील XSEED EDUCATION FOUNDATION या शिक्षण क्षेत्रात विश्वमान्य संस्थेच्या सहकार्याने मी जव्हार येथे ९ मे २०१६ रोजी कोणताही गाजावाजा न करता व कोणतेही औपचारिक उद्घाटन न करता Divine Orchids International Preschool या नावाने पूर्व-प्राथमिक शाळा सुरु करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता जागतिक दर्जाचे नवे शैक्षणिक दालन उघडले. २०१६ साली केवळ तेवीस मुलांपासून सुरु झालेल्या या नव्या शाळेची पट संख्या २०१८ साली पन्नास वर पोहचली. या क्षेत्रातील नवीन प्रयोगांमुळे आमचा अनुभव वाढत होता, तसतशी विद्यार्यांची संख्याही वाढत होती.

यशाची एक एक पायरी चढत असताना २०१९-२० हे शैक्षणिक वर्ष सरता सरता जगाला अचानक Covid-19 चे ग्रहण लागले. Covid वरून सहज आठवले, Covid आणि Sanitizer यांचे अतूट नाते आहे. परंतु कोविड वायरस येण्यापूर्वीच सन २०१६ ला शाळा सुरु केल्यापासून आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना Sanitizer ची सुविधा ठेवली आहे. विद्यार्थ्यांची खेळणी व शैक्षणिक साहित्य वेळोवेळी Sanitizer ने स्वच्छ करून ठेवले जाते.Divine Orchids International Preschool मध्ये जगात अनेक देशांनी स्वीकारलेल्या *XSEED – 5 STEP LEARNING या आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्याना शिकविले जाते. त्यासाठी शिक्षकांना Xseed Education Foundation, Singapore यांच्यामार्फत विशेष प्रशिक्षण दिले जाते; आणि म्हणूनच तमाम जव्हारकरांना अभिमान वाटावी अशी ही जव्हार तालुक्यातील स्वच्छ-सुंदर आणि; केवळ पुस्तकी ज्ञान देणारी नव्हे तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी एक आगळी-वेगळी शाळा आहे.

या शाळेत पाठांतरापेक्षा प्रात्यक्षिकावर जास्त भर असल्याने जसा एकदा पाहिलेला चित्रपट आपल्या कायम स्मरणात राहतो, अगदी तसेच एकदा शिकवलेले मुलांच्या कायम लक्षात राहते. हेच आम्ही अंगिकारलेल्या शिक्षण पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तका व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना अभ्यासाठी प्रत्येक विषयाचे स्वतंत्र Workbook दिले जाते. शिक्षकांना देखील प्रत्येक विषयाचे स्वतंत्र Teacher’s Manual दिले जाते. त्यात प्रत्येक Lesson कसा शिकवायचा त्यासाठी कोणती साधने वापरायची कोणते Digital Content वापरायचे याचे detailing असते, Digital content Projector द्वारे मोठ्या screen वर पाहतांना मुलांना आनंद होतो. त्यामुळे विद्यार्थांना विषय सोपा करून शिकविता येतो. या शाळेत सर्व धर्माचे सण आनंदाने साजरे केले जातात. आपल्या भोवतालच्या निसर्ग, पर्यटन स्थळे, शासकीय कार्यालय, खेड्यातील इतर शाळा, मुकबधीर विद्यालय, सेवाभावी संस्था यांच्या प्रत्यक्ष भेटी (Field Trip) या शाळेमार्फत वेळोवेळी आयोजित केल्या जातात आणि म्हणूनच ज्या पालकांना दर्जेदार शाळा हवी आहे अशा पालकांना Divine Orchids ही शाळा खूप आवडते.

सर्व काही सुरळीत चालू असताना *२०२० च्या डिसेंबर महिन्यापासून कोरोना नावाच्या जीवघेण्या विषाणूने अचानकपणे आक्रमण केले आणि एक अभूतपूर्व संकट सगळ्या जगावर कोसळलं. ते संकट दूर कुठेतरी आहे असं वाटत होते पण म्हणता म्हणता, ते आपल्या दारात-घरात कधी येऊन ठेपलं ते समजलं देखील नाही. इतक्या वेगाने त्याचा प्रसार होत आहे आणि जवळजवळ 180 देश मृत्यूच्या भीषण छायेखाली होरपळून निघाले आहेत. या भयानक विषाणूनं संपूर्ण जगभर भीती, अस्थिरता, चिंता, असुरक्षितता व मृत्यू यांचं थैमान घातले आहे. या जागतिक आपत्तीचा शिक्षण क्षेत्रावर सर्वाधिक गंभीर परिणाम झाला आहे. लहान मुलांच्या जीवितास हानी पोहचू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जगभरातल्या सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत.अचानक आलेल्या या संकटामुळे कोणत्याही शाळा या संकटाला सामोरे जाण्यास सज्ज नव्हत्या. गेल्या २० वर्षापासून मी संगणक क्षेत्रात काम करीत असल्याने माझ्या अनुभवाचा व तंत्रज्ञानाचा उपयोग खऱ्या अर्थाने आत्ता शाळेला होणार होता. त्यामुळेच शाळा online सुरु करण्यासाठी शासनाने परवानगी दिल्यानंतर शिक्षकांच्या व पालकांच्या सहकार्याने आम्ही अल्पावधीत या समस्येवर एकत्रितपणे मात केली; आणि २०२०-२१ या कोविडच्या उगवत्या काळात विद्यार्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ न देता संगणकाचा व मोबाईलचा वापर करून विद्यार्याना जमेल तितके ज्ञान देण्याचा १००% प्रयत्न आम्ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केला.

लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होत नाही असा समज होता त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नजीकच्या काळात कमी होऊन शाळा पूर्ववत सुरु होतील असे वाटले होते पण अचानक पुन्हा पहिल्या पेक्षाही जास्त मोठी कोरोनाची दुसरी लाट आली. कोरोनाची ही दुसरी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक ठरत आहे. लहान मुलांना संसर्ग होत असल्याचे पुरावे हाती आले आहेत. त्यामुळे शिक्षण जगतात पुन्हा एकदा निराशा पसरली आहे; परंतु आम्ही मात्र निराश न होता येत्या २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षाकरिता मुलांच्या व पालकांच्या गरजे नुसार, ONLINE EDUCATION देताना येणारी सध्याची आव्हाने लक्षात घेऊन 4PNG (4 POINT NEXT GENERATION) ही चार MODULES वर आधारित एक नवी EDUCATIONAL SUPPORT SYSTEM विकसित केली आहे. त्यामुळे पालकांना, मुलांना आणि शिक्षकांना SOCIAL DISTANCING चे नियम पाळून सुद्धा; त्यांना एकाच VIRTUAL तारेत एकत्र ओवून एक मजबूत साखळी निर्माण केली आहे. त्यामुळे ONLINE शिक्षण देणे सोपे होईल आणि कोरोनाच्या काळात मुलांना केवळ शैक्षणिकच नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि बौध्दिक या चार स्तरावर पालकांच्या आणि शिक्षकांच्या एकत्रित सहकार्याने मुलांचा सर्वांगीण विकास करण्यात आम्ही १००% यशस्वी होऊ असा आम्हास विश्वास आहे.

चार-पाच वर्षापूर्वी शहरातल्या दर्जेदार शिक्षणाची आपण बरोबरी करू शकत नाही याची खंत वाटत होती. परंतु आज जव्हार सोडून नोकरी अथवा बिझनेस करिता मोठ्या शहरात गेलेले, दुसऱ्या राज्यात गेलेले पालक सुध्दा शाळा ONLINE झाल्याने पालघर जिल्हयातील जव्हार येथील Divine Orchids मध्ये प्रवेशासाठी विचारणा करत आहेत; हेच निराशेतून जन्माला आलेल्या या शाळेचे मोठं यश आहे. २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर उदयास आलेली पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ही आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली डीवाइन ऑर्किड्स ही शाळा विद्यार्थ्यांना खरोखरच आशादायक आहे.

प्रवीण राजाराम मुकणे संस्थापक

दिनांक: ४.५.२०२१,

कठीण समय येता…शाळा बंद, शिक्षण चालू ! पालकांना कोण मदत करणार ?

ऑनलाइन शिक्षण हा सध्या चर्चेचा विषय आहे. परंतु ग्रामीण क्षेत्रात हे शिक्षण कसं देणार हे मोठे आव्हान आहे आणि हे आव्हान केवळ शैक्षणिक संस्था पुढे नसून पालकांना पुढे देखील आहे. मात्र सध्या ऑनलाईन शिक्षण घेणे किंवा पालकांनी स्वतः शिकवणे याला दुसरा पर्याय नसल्याने; प्रत्यक्ष वर्गात बसून घेतले जाणारे शिक्षण ते ऑनलाइन शिक्षण हा एवढा मोठा बदल स्वीकारण्याची मानसिकता आणि क्षमता  पालकांना स्वतः मध्ये निर्माण करावीच लागणार आहे. ऑनलाइन शिक्षणाचे फायदे/तोटे हा संपूर्ण वेगळा विषय आहे. मात्र ऑनलाइन शिक्षण यशस्वी होण्यासाठी पालकांचा सहभाग महत्वाचा आहे.

वर्षभर मुलं नाही शाळेत गेली, नाही शिकली तर काय बिघडत ?* हा विचार करून बऱ्याच पालकांनी गेल्यावर्षी आपल्या मुलांना वयाचे कारण देऊन ऑनलाइन शिक्षणा पासून वंचित ठेवले. परंतु या वर्षी देखील शाळा Online चालू राहतील अशी अपेक्षा नव्हती. *कारण कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे व येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे शाळा किती काळ Online चालू राहतील याचा अंदाज कुणालाच नाही. त्यामुळे मुलांची सुरक्षितता जपणं, त्यांचं आणि पालकांनी स्वतःचे मनोधैर्य टिकवणं हेच आजचं खूप मोठं आव्हान आहे.

*नैसर्गिक नियमानुसार पहिली सहा वर्ष मुलांच्या विकासासाठी अतिशय महत्वाची असतात.*

*या कालावाधीतच भावी काळातील आरोग्य, वाढ आणि बौद्धिक विकास या सर्वांचा पाया ह्या वर्षांमध्ये घातला जातो.

*ह्या कालावधीत मुलांचा शिकण्याचा वेग सर्वाधिक असतो.*  

*पहिल्या सहा वर्षातच मुलाच्या मेंदूचा खरा विकास होत असतो.*

*त्या वयोगटातील मुलाला आपण (आई-वडील, शिक्षक, समाज) काय देतोय, या वर त्या मुलाच्या भावी आयुष्याची जडणघडण होते.

*या वयात अभ्यासाच्या सवयी लागल्यास ती जीवनभर कायम राहते*

*या वयोगटातील मुले नवनवीन तंत्रज्ञानही लगेच आत्मसात करतात.*

*या वयात एखादी चुकीची संकल्पना डोक्यात बसल्यास नंतर ती DELETE करणे कठीण होते.* त्यामुळे आपल्या छोट्या मुलांसमोर ONLINE शिक्षण प्रणाली बद्दल चुकीचे अथवा नकारात्मक मत कधीच व्यक्त नका. कारण नकारात्मक विचाराने भविष्यात शालेयोत्तर जीवनात त्यांना बदलत्या ONLINE शिक्षण प्रणालीचा प्रभावी वापर करण्याची आवड राहणार नाही.

त्यामुळेच ऑनलाइन शिक्षणा भविष्यात जेव्हा कधी शाळा सुरू होतील तेव्हा होतील मात्र *मुलांच्या भवितव्याचा विचार करता आज त्यांना फार काळ ऑनलाइन शिक्षणा पासून दूर ठेवणे परवडणारे नाही.* कारण येणारा काळ हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आहे. ऑनलाईन शिक्षण हे शिक्षणाचे भविष्य आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे जगभरातील सर्व विद्यापीठांचे शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी उघडले गेले आहेत. आता परदेशात न जाताही घरबसल्या जगभरातील नावाजलेल्या शाळा कोलेज आणि विद्यापीठात कोणालाही दर्जेदार शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे उच्च शिक्षणाचा खर्च कमी होणार आहे.    

नाइलाज म्हणून का होईना, पण सध्यातरी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑनलाइन शिक्षण हाच उपाय योग्य आहे असे आता पालकांना देखील वाटू लागले आहे. म्हणून ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय आपण अवलंबिलेला आहे.

*कोरोनाचे जीवघेणे संकट आपल्यासमोर कितीकाळ उभे राहील हे माहिती नाही. पण मुलांच्या शिकण्याच्या दुर्दम्य इच्छेचे दमन करू शकेल इतके बळ या संकटात नाही.* कारण मूल जन्म घेते तेव्हापासूनच त्याचे ‘शिकणे’ सुरू होते. ते श्वास घ्यायला शिकते, हसायला शिकते, भाषा शिकते, नातेवाइकांना ओळखायला शिकते. त्याच्या शिकण्याच्या क्रियेला हळूहळू घराची, कुटुंबाची चौकट अपुरी पडू लागते. मग मूल परिसरातून शिकू लागते. *पण ह्या आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला सोशल डिस्टन्सिंग तर पाळायचेच आहे, पण मुलांचे शिक्षणही थांबायला नको; त्यामुळे तांत्रिक अडचणींना असल्यातरी त्यांना सामोरे जात आणखी काही दिवस मुलांना ऑनलाइन शिक्षण घ्यावेच लागणार आहे.*

शाळा महाविद्यालये विद्यापीठ व त्यातील शिक्षक कर्मचारी यांच्या मागे मोठी शासकीय व खासगी संस्थांची यंत्रणा उभी आहे. *परंतु त्यातील विद्यार्थी-वर्गाच्या पालकांना या कठीण परिस्थितीत मदत करण्यासाठी त्यांच्या मागे कोणतीच यंत्रणा उभी नाही. मग अशा वेळी त्यांच्यासाठी काय करता येईल?* हा विचार करून गेल्या वर्षभराच्या कोरोना काळात अनियमित असणारा विजेचा पुरवठा, नेट कनेक्टिव्हिटी नसणे इत्यादी अडचणींचा आम्ही अभ्यास केला आणि *योग्य तंत्रज्ञानाची सांगड घालून लहान मुलांना प्रात्यक्षिकासह ऑनलाईन कसे शिकवायचे व विशेष शिक्षण पद्धतीचा वापर करून त्यांचे मन शिकण्याच्या प्रक्रियेत नसर्गिक पणे कसे गुंतवून ठेवायचे याचे शिक्षकांना खास प्रशिक्षण देऊन; तंत्र स्नेही शिक्षक आणि लहान मुलांना जीवनावश्यक कौशल्ये शिकवण्यासाठीचा विशेष अभ्यासक्रम यासह आम्ही खास छोट्या मुलांसाठी XSEED Education Foundation, Singapore आणि Rajaram Mukne Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते ६  वयोगटातील मुलांकरिता त्यांच्या वयानुसार Nursery, LKG,UKG असे Special Online वर्ग सुरू करीत आहोत.*

*आज बहुतांशी पालकांना संभ्रम आहे कि लहान मुलांना ऑनलाईन लर्निंग पद्धत झेपेल कि नाही?* त्यांच्या मनातील या शंकेमुळे गेल्यावर्षी बहुतांशी लहान मुले शिक्षणापासून वंचित राहिली. या वर्षी तसे होऊ नये म्हणुन  

*पालकाच्या मनातील हि शंका दूर व्हावी यासाठी आम्ही पूर्ण एक महिन्याचे मोफत ONLINE वर्ग चालू केले आहेत.*

*या Special Online वर्गाचे फायदे खालील फायदे प्रमाणे आहेत :*

*कोरोनाचा कोणताही धोका न पत्करता विद्यार्थी व शिक्षक व पालक ऑनलाइन संवाद साधू शकतील.*

*शहरात मिळणारे दर्जेदार व उत्तम शिक्षण ग्रामीण भागातील मुलांना पण मिळू शकेल. *

*मुलगा ऑनलाइन अभ्यास करतो आहे की नाही यावर पालक लक्ष ठेवू शकतील. *

*मोबाईलवर गेम खेळणे, टीव्ही पाहणे याऐवजी मुले ऑनलाइन अध्ययनात राहतील. *

*शाळेत जाण्या-येण्यासाठी लागणारा आणि शाळेची तयारी करण्यासाठी लागणारा वेळ, शिवाय अतिरिक्त शिकवणी वर्ग यामध्ये जाणारा वेळ वाचण्यास मदत झाली. *

*हा वाचलेला वेळ मुलांना व्यायाम अथवा अभ्यासासाठी वापरता येईल.*

*तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात त्याविषयी गोडी निर्माण होईल व त्यामुळे भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा पाया रचला जाईल  होऊ लागली आहे.*

*तंत्रज्ञानाचा व SOFTWARE यंत्रणांचा अचूकपणे वापर करता येऊ लागेल.*

*या ३० दिवसांच्या TRIAL नंतर पालकांच्या मनातील संभ्रम दूर होईल आणि ते REGULAR ONLNE शिक्षण चालू ठेवण्यासाठी प्रवेश घेऊ शकतील असा विश्वास आहे. कारण लहान मुलांना प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन व मानसिक पातळीवरील चालना तसेच आरोग्य  संगोपन व पोषक आहार मिळाल्यास ती नक्की उत्साहाने शिकतात. तरी पालकांनी या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन एक महिन्याच्या मोफत ONLINE CLASS साठी आपल्या लाडक्या मुलांचा प्रवेश आजच निश्चित करावा हि विनंती.*

कोरोनाचे हे संकट कायमचे निघून जाऊन सगळे काही पूर्ववत होईलच हा विश्वासही वाटतोच. तोपर्यंत आपण सगळे जण आपापल्यापरीने या कठीण परिस्थितीत एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करत राहूच. नाही का?